लाईफ इन पुणे मेट्रो...

 लाईफ इन पुणे मेट्रो...


      पुणे शहर जगाच्या नकाशावर शैक्षणिक, संशोधन तसेच विकासात्मक संस्था, आय.टी. पार्कस्‌ आणि पश्चिम महाराष्ट्रातील ऑटोमोबाईल उद्योगांमुळे ओळखले जाते.गेल्या काही दशकांत शहराची लोकसंख्या वाढली. देशाच्या विविध भागांतील लोक रोजगाराच्या संधीमुळे पुण्यात स्थलांतरित झाले. परंतु, नागरिकांना मिळणाऱ्या निरंतर आणि शाश्वत पायाभूत सुविधांचा या शहरात अभाव होता. पुण्यातील नागरिकांचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून प्रवासात जाणारा सरासरी वेळ हा १०० मिनिटांच्या वर आहे. या कारणामुळे अधिकाधिक नागरिक स्वत:च्या वाहनांचा उपयोग करू लागले. यामुळे शहरात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. अपघाताचे प्रमाण वाढले.



                 या सर्व समस्यावर मात करण्यासाठी 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी पुणे मेट्रो चे भूमिपूजन केले. तेव्हापासून बहुचर्चित असलेला पुणे मेट्रोचा प्रकल्प सर्वांचा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. संथ गतीने होणारं काम आणि त्यात झालेले राजकारण यामुळे मेट्रोचे काम पुर्ण होण्यास जास्त लागला.


हा प्रकल्प 2025 असा अंदाज वर्तवला जात आहे. वास्तविक पाहता पुण्यामध्ये सध्या रुबी हॉल ते वनाज तसेच सिविल कोर्ट ते पिंपरी चिंचवड हे दोन मार्ग सध्या चालू आहेत. याबरोबरच शिवाजीनगर ते हिंजवडी ह्या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. पुणे मेट्रोचे किमान तिकीट भाडे 10 रुपये आहे, तर मार्गावरील कमाल भाडे 35 रुपये आहे .आठवड्याच्या शेवटी लोकांना सुमारे 30% सवलत मिळेल आणि विद्यार्थ्यांना पुणे मेट्रोवर प्रवास करण्यासाठी सुमारे 30% सवलत देखील मिळते.



        रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी प्रवाशांना मेट्रोकडे वळवण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या जशी कमी होईल तसे हवेच्या गुणवत्तेत देखील सुधारना होईल,प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांपर्यंत कमी होईल,वैयक्तिक वाहन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी खर्च होईल. हे सर्व असताना देखील पुणे मेट्रो मध्ये प्रवास करण्याचे प्रमाण कमी होताना दिसत आहे.जेव्हा पुणे मेट्रो सुरु करण्यात आली तेव्हाचा काळ हा गणेशोत्सव दहीहंडी इत्यादी उत्सवाचा काळ होता. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव देखावे पाहण्यासाठी बाहेरून लोक येत असतात. त्याचप्रमाणे पुणे शहरांमध्ये पहिल्यांदाच मेट्रो सेवा सुरू करण्यात आली होती त्यामुळे सुरुवातीला पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला तसेच उत्सवाचे दिवस असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांनी मोठ्या प्रमाणात मेट्रोचा प्रवास केला. पुणे हे शहर दुचाकीचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. त्याचे कारण हेच की सिटीबस ने प्रवास करताना खूप जास्त वेळ लागतो, तसेच मेट्रोची सुविधा संपूर्ण पुण्यामध्ये अद्याप सुरू झालेली नाही. कदाचित त्यामुळेच मेट्रोमध्ये प्रवास करण्याचे प्रमाण कमी झाले असावे. तसेच जवळ-जवळ असलेले मेट्रोचे थांबे आणि मेट्रो प्रकल्प पूर्ण होण्यास लागलेला 7 वर्षाचा कालावधी हा देखील लक्ष देण्याचा घटक आहे.

 

Comments

Popular posts from this blog