सावधान ! पुण्यातील हवा प्रदूषण वाढले.
पुण्यातील हवेची स्थिती मागील अनेक दिवसांपासून खराब असल्याचं चित्र समोर येत आहे. त्यातच आता फटाक्यांमुळे पुण्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचं समोर आलं आहे.पुण्यात मागील अनेक दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे.दिवाळीत खास करून प्रत्येक वर्षी लक्ष्मी पूजनानंतर वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचं चित्र बघायला मिळतं. लक्ष्मीपूजनाला मोट्या प्रमाणात फटाके उडवले जातात आणि त्यामुळे हवा प्रदुषण वाढते.फटाक्यांच्या आतिषबाजीने होणारे प्रदूषण यामुळे श्वसनाचे त्रास नागरिकांना होत आहेत.सफर या संस्थेच्या आकडेवारीनुसार पी.एम.2.5 या धूलिकणांचे प्रमाण वाढलं असल्याचं सांगण्यात आलं. PM 2.5 मुळे हृदयविकार, दमा आणि नवजात मुलांच्या वजनात फरक पडणे यांसारख्या आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो. PM 2.5 च्या वाढलेल्या पातळीमुळे दृश्यमानता कमी होऊ शकते आणि हवेत धुके दिसू लागते. सफर संस्थेच्या आकडेवारीनुसार सध्याची पुण्यातील स्थिती ही चिंताजनक आहे.
मात्र दिवाळी संपल्यानंतर पुण्यातील प्रदुषण देखील कमी झाल आहे. सध्या पुण्यातील विविध भागात हवेतील गुणवत्ता सुधारत आहेत तसेच काही भागात हवा प्रदुषण जास्त आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मेट्रो प्रकल्पामुळे देखील हवा प्रदुषण वाढत आहे. महा मेट्रो प्रकल्पामुळे स्वारगेट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात वाहनाची प्रचंड गर्दी होत आहे. स्वारगेट येथील जेधे चौकात मेट्रो हब आणि बहुमजली इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. या चौकात दिवसभर नागरिकांची मोठी गर्दी असते. तसेच वाहनांच्या वर्दळीमुळे प्रदूषण होत असते. मेट्रो हबच्या ठिकाणी बांधकामासाठीचा आरएमसी प्लांटही असून खडी, सिमेंट वाहून आणणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. पण या ठिकाणी काम करताना मेट्रोकडून नियमावलीकडे दुर्लक्ष केले जात आहे.शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मेट्रो स्थानकाच्या कामाच्या ठिकाणी तसेच रेडिमिक्स प्लान्टभोवती पत्रे उभारणे आणि हिरवे आच्छादन टाकणे बंधनकारक असतानाही मेट्रो प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, अन्यथा काम बंद करावे लागेल, असा इशारा महापालिका आयक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिला आहे.हवा गुणवत्ता निर्देशांक - हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) पर्यावरणाच्या संदर्भात दररोजच्या हवेच्या गुणवत्तेची नोंद करण्यासाठी वापरली जाणारे एक संख्यात्मक प्रमाण आहे.या निर्देशांकाच्या दैनंदिन निकाला वरून वायू प्रदूषणाच्या पातळीचा घेतला जातो.हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकातील वाढ ही वायू प्रदूषण आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका दर्शविते.एकंदरीत AQI हे सूचित करते की आपल्या सभोवतालची हवा किती स्वच्छ किंवा प्रदूषित आहे आणि त्या मुळे आपल्या आरोग्याला काय धोका असू शकतो. हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या श्रेणी एक्यूआय सहा विभागांमध्ये विभागले गेले आहेत आणि प्रत्येक श्रेणी वेगवेगळ्या आरोग्यविषयक चिंतेच्या पातळीशी संबंधित आहे. श्रेण्या आणि त्यांचे अर्थ यांचे स्पष्टीकरण ०-५० “चांगले” एक्यूआय. या स्तरावर हवेची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे मानले जाते आणि वायू प्रदूषणास कमी किंवा कोणताही धोका नसतो. 51 - 100 "मध्यम" एक्यूआय. याचा अर्थ स्वीकार्य वायु गुणवत्ता. तथापि, काही प्रदूषक मर्यादित संख्येच्या लोकांसाठी आरोग्यासाठी मर्यादीत चिंता निर्माण करू शकतात. उदाहरणार्थ, ओझोनबद्दल संवेदनशील असलेल्या व्यक्तींमध्ये श्वसनसंबंधित तक्रारी येऊ शकतात. 101 - 150 "संवेदनशील गटांसाठी आरोग्यास हानिकारक" एक्यूआय. या श्रेणीचा जनतेच्या सामान्य आरोग्यावर परिणाम होऊ शकणार नाही. तथापि, ओझोनच्या जोखमीमुळे मुले, वृद्ध प्रौढ आणि फुफ्फुसांचा आजार असलेल्या लोकांना जास्त धोका असतो. मोठी मुले, प्रौढ आणि फुफ्फुसाचा आणि हृदयरोगासह असणा-या व्यक्तींना पार्टिक्युलेट मॅटरच्या संपर्कात येण्याचा धोका जास्त असतो. 151 - 200 “अस्वस्थ” एक्यूआय. या श्रेणीमध्ये, प्रत्येक व्यक्तीस आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. संवेदनशील गटाच्या सदस्यांना अधिक गंभीर परिणाम जाणवू शकतात. २०१-3०० अतिशय अस्वस्थ आरोग्य आणीबाणीच्या परिस्थितीचा इशारा. संपूर्ण लोकसंख्येवर याचा परिणाम होण्याची अधिक शक्यता असते. सक्रिय मुले आणि प्रौढ आणि दम्यासारख्या श्वसनाच्या आजाराने ग्रस्त लोक सर्व बाह्य श्रम टाळले पाहिजेत. इतर प्रत्येकाने, विशेषत: मुलांनी बाह्य श्रम मर्यादित केले पाहिजेत. 300 पेक्षा मोठे "धोकादायक" एक्यूआय . या स्तरावरील हवेची गुणवत्ता जीवघेणी असते आणि संपूर्ण लोकांसाठी आपत्कालीन परिस्थितीबद्दल चेतावणी जारी करण्यात येते. ढगाळ वातावरण आणि हवेतील ओलावा यामुळे प्रदूषकांचा कमी प्रसार होतो आणि त्याशिवाय रस्ते खोदणे आणि डांबर टाकल्यामुळे धूलिकणाची पातळी वाढणे हे वायू प्रदूषणात वाढ होण्याचे एक कारण आहे,” डॉ बीएस मूर्ती, प्रकल्प संचालक, सफर, प्रकल्प संचालक इंडियन एक्सप्रेसला सांगितले. सध्या पुण्यातील बऱ्याच भागातील प्रदुषण नियंत्रणात आले आहे. पुण्यातली शिवाजीनगर , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर सोडता इतर भगात प्रदुषण नियंत्रण आले आहे. सध्याची हवा गुणवत्तेची स्थिती.
Comments
Post a Comment